पाऊस असा पाऊस तसा

पाऊस असा पाऊस तसा

Submitted by Dr Raju Kasambe on 14 August, 2019 - 11:41

पाऊस असा पाऊस तसा

पाऊस कोसळधार
नुसताच धो धो कोसळणारा
चाकरमान्यांची तारांबळ उडवणारा !

पाऊस रिमझिम
ओलेचिंब भिजवणारा
सर्वांना रोमॅन्टिक बनवणारा !

पाऊस धमकावणारा
विजांच्या गडगडाटात
नुसतेच चार थेंब शिंपडणारा !

पाऊस रीप रीप
गरमागरम चहा भज्यांची
आठवण करून देणारा !

पाऊस ढगफुटीचा
नावानेच घाम फोडणारा
गावही गिळंकृत करणारा !

पाऊस मुसळधार
महापुराचे थैमान घालणारा
घर संसार उध्वस्त करणारा !

पाऊस न बरसणारा
दुष्काळ अवर्षण घडवणारा
अश्रूंच्या धारा बरसवणारा !

Subscribe to RSS - पाऊस असा पाऊस तसा