एकाला विकास आणि दुसऱ्याला ठेंगा

एकाला विकास आणि दुसऱ्याला ठेंगा

Submitted by Dr Raju Kasambe on 14 August, 2019 - 07:35

एकाला विकास आणि दुसऱ्याला ठेंगा

जमिनीतले पाणी संत्रा वाल्यांनी उपसले
कापूसवाले आभाळाला डोळे लावून बसले !

धरणातले पाणी ऊस द्राक्ष पिऊन गेले
पिण्याच्या पाण्याचे टँकर आत्ताच येऊन गेले !

बळी राजा देतो रोज स्वतःचाच बळी
इथे मात्र नोटा छापते उसाची मळी !

ऊस द्राक्ष केळी वाला कारीतनं फिरतो
कापूसवाला भाऊ का कर्ज मागत फिरतो?

कापूस देऊन शेतकरी पैशाची वाट बघत बसतो
ऊस द्राक्ष केळीवाला एसीत रोख मोजत असतो !

शेतीसाठी कर्ज देण्या बँका फितूर झाल्या
कारसाठी कर्ज देण्या मात्र आतुर झाल्या !

Subscribe to RSS - एकाला विकास आणि दुसऱ्याला ठेंगा