बाप-लेक
Submitted by आस्वाद on 26 July, 2019 - 18:47
नेहाला कळा सुरु होताच निशांत तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. पुढचे काही तास हुरहूर, काळजी आणि वाट पाहण्यात गेले. जेव्हा आतून रडण्याचा आवाज आला तेव्हा निशांत, आजी, आजोबा आणि बाळाची ताई सगळेच आनंदले. ताई तर आनंदाने नाचायलाच लागली. तिला एक छोटुकला भाऊ मिळणार आहे, हे तिला जेव्हा आई- बाबांनी सांगितलं तेव्हा पासून तिला त्याला बघायची घाई झाली होती. इतके महिने वाट पाहून पाहून ती कंटाळलीच होती. डॉक्टरनि आत जायला परवानगी दिल्याबरोबर सगळे आत गेले. त्या छोट्याशा रूम मध्ये आनंद ओसंडून वाहत होता.
विषय:
शब्दखुणा: