धागा

अदृश्य धागा....

Submitted by दवबिंदू on 28 May, 2020 - 11:18

अदृश्य धागा...

सगळे एका माळेतील मणी होतो ...
कधी भावंड म्हणून,
कधी शाळासोबती म्हणून,
कधी शेजारी म्हणून,
कधी सहकारी म्हणून.

काळाच्या ओघात,
रोजच्या व्यापात,
गाठ माळेची सुटली...
मणी विखुरले...
काही इथे, काही तिथे,
काही सातासमुद्रापलिकडे.

सोशल मिडिया जणू ...
अदृश्य धागा...
विखुरलेल्या मण्यांना,
एकत्र सांधणारा.

भेटतात इथे पुन्हा,
हरवलेले सगेसोयरे...
अनोळखी झालेले,
ओळखीचे चेहरे.

पडतात गाठी
इथे नव्याने...
जुळतात धागे
काही जुनेच नव्याने.

कृपया कोणी सांगेल काय?

Submitted by mi manasi on 4 August, 2019 - 22:16

लेखनाचा धागा आणि वाहते पान दोघांमध्ये काय फरक आहे?
म्हणजे लिहितांना लेखनाचा धागा कधी वापरावा आणि वाहते पान कधी वापरावे?

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - धागा