कृपया कोणी सांगेल काय?

Submitted by mi manasi on 4 August, 2019 - 22:16

लेखनाचा धागा आणि वाहते पान दोघांमध्ये काय फरक आहे?
म्हणजे लिहितांना लेखनाचा धागा कधी वापरावा आणि वाहते पान कधी वापरावे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाहत्या पानावर एकतिसावा प्रतिसाद पडला की पहिले १५ प्रतिसाद गायब होतात - वाहून जातात. त्याला गप्पांचं पान म्हणतात..
लेखनाच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाहून जात नाहीत

वाहते पान गप्पांसाठी , अंताक्षरी इत्यादीसाठी आहे.

वाहत्या पानावर एकतिसावा प्रतिसाद पडला की पहिले १५ प्रतिसाद गायब होतात - वाहून जातात. त्याला गप्पांचं पान म्हणतात..

म्हणजे जो अधून-मधून, क्वचित आठवड्यातून एकदाच मायबोलीवर येतो त्यालासुद्धा हे आधीचे प्रतिसाद दिसत नाहीत का? तसे असेल तर मग त्याला विषयाचा संदर्भ लागणेच कठीण होईल!!!

तसे असेल तर मग त्याला विषयाचा संदर्भ लागणेच कठीण होईल!!!

नवीन Submitted by विक्षिप्त_मुलगा on 5 August, 2019 - 12:21>>>>

कधी कधी येणारेच काय, रोज येणार्यांना सुद्धा संदर्भ लागत नाही. मी एका वाहत्या पानावर एका माणसाशी चर्चा केली ज्याला त्याने आदल्या दिवशी स्वतःच ट्रोलीगसाठी टाकलेल्या एका फोटोखाली काय लिहिले ते आठवत नव्हते आणि तो आधीचा प्रतिसादही उडून गेला होता.

नंतर एकदा दुसर्या एका व्यक्तीकडून तिने टाकलेला प्रतिसाद वाहत्या घाग्यात आपोआप उडून गेल्यावर "मी असे कधी लिहिले त्याचे पुरावे आणा" वगैरे मखलाशी सुरू झाली.

वाहते पान कधी कधी सोयीचे वाटले तरीही त्याच सोयीमुळे गैरसोयीचेही होऊ शकते.

तसे असेल तर मग त्याला विषयाचा संदर्भ लागणेच कठीण होईल!!! >> हो. असा संदर्भ लागणार असेल तर ती चर्चा वाहत्या पानावर करू नये. स्वतंत्र धागा काढून करावी.

कधी कधी चर्चेचा विषय जरी असला तरी काहीजणांच्या मतांमुळे
चर्चा वादाचं रुप घेते.आणि धाग्याचं वाहतं पान होतं.

चर्चा वादाचं रुप घेते.आणि धाग्याचं वाहतं पान होतं.
>> म्हणजेच वेमा/ अॅडमिन काही ...... प्रतिसाद उडवतात व उडवाउडवीत काही चर्चा/वाद करणारे सुध्दा उडून गायबतात.
Lol