हिरवा वा निळा कुणीही नसतो

त्वचेआत भगवा, हिरवा वा निळा कुणीही नसतो

Submitted by बेफ़िकीर on 14 April, 2019 - 12:55

कुणी पाजले अनुयायांना प्याले हे सांगा की
नको व्हायला होते ते का झाले हे सांगा की

आगी नेत्यांनीच लावल्या, पटले तुमचे म्हणणे
तुमच्या मनात इंधन कुठून आले हे सांगा की

छातीवर झेलतात त्यांची पूजा करता करता
पाठीतच घुसलेत कुणाचे भाले हे सांगा की

स्वतःहून चाललात की गेलात तुम्ही चालवले
हात रिकामे अन् का पायी छाले हे सांगा की

त्वचेआत भगवा, हिरवा वा निळा कुणीही नसतो
लालच रंगाने सारे का न्हाले हे सांगा की

=====

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - हिरवा वा निळा कुणीही नसतो