कथेने खाल्लेला अमिताभ - 'बदला'

कथेने खाल्लेला अमिताभ - बदला''

Submitted by बेफ़िकीर on 18 March, 2019 - 12:18

बहुधा प्रथमच असे घडले असावे की त्याच्या जागी नसिर किंवा तत्सम कोणी असता तरी तितकाच प्रभावी ठरू शकला असता. बदला चित्रपटाच्या कथेने अमिताभला खाऊन टाकलेले आहे. पांढरी दाढी स्वीकारल्यापासून असलेली तीच तीच शैली वापरण्यापलीकडे साहेब या चित्रपटात जाऊ शकलेले नाहीत. खरे तर या स्तराच्या अभिनेत्याला अजून काहीच्या काही अभिनयगुण दाखवता यावेत अशा भूमिका मिळायला हव्यात. मात्र बदला ही कथा अशी आहे की कथा ९९.९९ टक्के आहे आणि बाकी सगळे अभिनेते, सीन्स हे उरलेल्या ०.०१ टक्क्यात सामावलेले आहेत.

Subscribe to RSS - कथेने खाल्लेला अमिताभ - 'बदला'