कथेने खाल्लेला अमिताभ - बदला''

Submitted by बेफ़िकीर on 18 March, 2019 - 12:18

बहुधा प्रथमच असे घडले असावे की त्याच्या जागी नसिर किंवा तत्सम कोणी असता तरी तितकाच प्रभावी ठरू शकला असता. बदला चित्रपटाच्या कथेने अमिताभला खाऊन टाकलेले आहे. पांढरी दाढी स्वीकारल्यापासून असलेली तीच तीच शैली वापरण्यापलीकडे साहेब या चित्रपटात जाऊ शकलेले नाहीत. खरे तर या स्तराच्या अभिनेत्याला अजून काहीच्या काही अभिनयगुण दाखवता यावेत अशा भूमिका मिळायला हव्यात. मात्र बदला ही कथा अशी आहे की कथा ९९.९९ टक्के आहे आणि बाकी सगळे अभिनेते, सीन्स हे उरलेल्या ०.०१ टक्क्यात सामावलेले आहेत.

एक काळ असा होता की 'अमता वच्चन 'साठी रोल लिहिले जायचे. जे कोणीही कधीही करू शकत नाही पण प्रत्येकाला मनातून वाटत असते असे काहीतरी तो पडद्यावर करून दाखवायचा. अगदी अलीकडे ऋषी कपूरचा बाप बनतानाही त्याने किंचित तरी काहीतरी वेगळे दिले होते. मात्र बदला या चित्रपटाच्या कथेने त्याला त्याच्या शैलीतून म्हणा किंवा चौकटीतून म्हणा, बाहेर पडायची संधीच दिलेली नाही.

हे लिहिताना हे मान्य करायलाच हवे की त्याने ही भूमिका अफाट साकारलेली आहे. तरीही, 'तिथे इतर काहीजण चालू शकले असते'हे मनात आल्याशिवाय राहिले नाही.

कथा इतकी वेगवान आणि डोकॅलिटीने रचलेली आहे की कोण कोणती भूमिका करत आहे याकडे प्रेक्षकाचे फारसे लक्षही जाऊ नये. प्राण, दिलीप कुमार, संजीव कुमार, राजेश खन्ना यांना एकेकाळी कच्चा खाणारा माणूस या कथेतील एक असे पात्र बनतो जे आहे तर महत्वाचे पण ते पात्र कोणी साकारावे याबद्दल मनात काही खास अपेक्षा निर्माण होत नाहीत. मला तर वाटते की अशोक कुमार (दादामुनी) या अभिनेत्याने या भूमिकेचे प्लॅटिनम केले असते.

अमिताभच्या डोळ्यांत आजही तोच अंगार दिसतो ज्याच्या प्रेमात माझी आणि नंतरची एक पिढी वेडी झाली. आजही सूडकथा साकारावी तर त्यानेच! मात्र त्याने सूडकथा साकारणे यात नेहमीच त्याची एक अमिताभीय वाटचाल दिसून यायची. ती वाटचाल हीच कथा असायची. इथे कथा वेगळी आहे आणि त्याची वाटचाल स्वतंत्र! तितकीच शानदार पण स्वतःच कथा न ठरणारी अशी वाटचाल!

संवादांबद्दल असे ऐकले होते की खूपच काहीतरी इन्टेलेक्चुअल मटेरिअल आहे. प्रत्यक्षात असे वाटले की ते संवाद हेही कथेचे गुलाम आहेत. एखादा लार्जर दॅन लाईफ अभिनेता चित्रपटात आहे म्हणून खास संवाद म्हणून खूप काही लिहिता आले असते असेही मनाला वाटून गेले.

मला वाटते की आजकाल इतके जबरदस्त वेगवान, तांत्रिक बाबींवर आधारलेले आणि डोक्याला शॉट देणारे कथानक असलेले चित्रपट येतात की बहुधा मोठ्यात मोठ्या अभिनेत्यालाही त्यात अभिनय करण्यास फारसा वाव राहत नसावा. एक प्रकारे हेही बरेच आहे की खूप वर्षांनी नावीन्यपूर्ण आणि कल्पक कथानके बघायला मिळत आहेत. अशी कथानके जेथे खान्स, कपूर्स, कुमार्स, देवगण्स आणि आयुष्मान्सही खपून जातील.

खंत एकच राहते मनात! ज्याच्यासाठी म्हणून भूमिका लिहिल्या जायच्या, ज्याच्या प्रवेशाच्या आधी शिट्ट्यांनी चित्रपटगृह दणाणून जायचे, जो रडला की प्रेक्षक रडायचे, ज्याने मारामारी केली की आपण सूड उगवल्याचा आनंद व्हायचा, तो अमिताभही या युगाने गिळंकृत करायचा घाट घातलेला दिसतो.

=====

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजकारण व समाजकारण याव्यतिरिक्त तुम्हाला लिहिताना बघून बरं वाटलं. तिथं तुमच्या पोस्टस अत्यंत भाबड्या, अनरिआलिस्टिक आणि स्वत:लाच फसवणार्या अशा वाटत होत्या. ते बंद केल्याबद्दल माझ्याकडून स्पेशल अभिनंदन. तुमचं फिक्शन सरसकट उच्च नसलं, तरी काही वेळेला मनापासून मान डोलवायला होतं, आणि उरलेल्या पैकी काही वेळेला करमणुक होते, चार क्षण खरंच छान जातात हे मान्य करतो.

अमिताभ वरची टीका तुम्ही अगदी नेम धरून चुकीच्या ठिकाणी करत असल्याचं मला अनेक वेळा वाटलं आहे. कथेने खाल्लेला अमिताभ - असं म्हणत; लेखकाच्या फिक़्शनधर्माला जागला असलात तरी तुमच्या धर्माचं (फिक्शनचं) ते एकमेव प्रिरिक्विझिट नव्हे. अमिताभशिवाय इतर कुणीही करू शकला असता असं म्हणतानाच कथेबद्दल मात्र फारसं बोलला नाहीत. म्हणजे कथेने खाऊनही बच्चनच हायलाईट.

बादवे, कथेबद्दलही बरीच उलटसुलट मते आहेत ती वाचलीत का. कथेच्या भक्तांनी बदला, बदलापूर, अंधाधून इ. सारख्या अनेक सिनेम्यांवर आणि कथांवर गेटटुगेदर केली पाहिजेत.

नेम धरून, इतर ठिकाणचे अनावश्यक संदर्भ उगीच घेऊन, विशिष्टच व्यक्तीबाबत पर्सनल होऊन, ऐन वेळी प्रतिसाद द्यायला धावून, आपलीच मते निर्विवाद योग्य असल्याच्या आवेशात तुम्ही अनेक दिवसांनी दिसलात हे पाहून कुठेतरी मायबोलीचा जुना भाबडेपणा जागृत आहे हे जाणवले व बरे वाटले

तुम्हाला.आँफेंसिव्ह वाटलं असल्यास माफ करा. कथा - या गोष्टीवर तुमचंं आहे तसंच माझंही प्रेम आहे. शीर्षक बघून इकडे आलो, आणि सिनेमा बघितलेला असल्याने लिहावंसं वाटलं इतकंच..

मला आवडला यातला अमिताभ (आणि तापसीही). अनेक दिवसांनंतर त्याला चपखल बसलेले संवाद दिले गेले आहेत असे मला वाटले.

अमिताभच्या रोल्स मधले दोन मला तिटकारा असलेले मॅनरिझम्स आहेत - एक ते ९० च्या दशकात अचानक आलेले "हॉय?" आणि पुढे अनेक वर्षांनी चोप्रा-जोहर च्या चित्रपटात आजोबा रोल मधले शुद्ध हिंदी व काही उच्चारांवर जोर देउन संवाद म्हणण्याची पद्धत - थोडे हॅमिंग च्या वळणावर जाणारे. अमिताभ च्या आधीच्या चित्रपटांमधल्या स्पॉण्टेनियस संवादफेकीत हे कधीच नव्हते. ते नंतर उपटले. ते या चित्रपटात अजिबात दिसले नाही. त्यामुळे त्याचे संवाद आवडले.

"जिमी आपकी बहुत तारीफ कर रहा था"
"गुड, वरना मुझे अपनी तारीफ खुद करनी पडती"
- सारखे संवाद हशा पिकवून जातात.

एकूण मला चित्रपट अगदी साधारण पण अमिताभ-तापसी आणि संवाद हे जबरी असे वाटले. अमिताभ उठून दिसला, जरी त्यात जुन्या अमिताभची झाक नसली तरी.

बेफि, आय थिंक मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. मी "बदला" पाहिलेला नाहि पण मूळचा स्पॅनिश चित्रपट पाहिलेला आहे. त्यात्ले ट्विस्ट्स आणि टर्न्स इतके वाखाणण्याजोगे आहेत, शिवाय कथाच एव्हढि ताकदिची आहे कि त्या दृष्टिकोनातुन तुमचा मुद्दा पटतो. बच्चन साहेबांकडे टुकार कथानक असलेला चित्रपट स्वतःच्या अभिनयावर तारुन नेण्याचं सामर्थ्य आहे, बदला सारखे चित्रपट तर त्यांचा डाव्या हाताचा खेळ. हि वस्तुस्थिती असताना, "बदला" या चित्रपटाचं बच्चनायझेशन केलं असेल तर ते दुर्दैवी आहे...

"बदला" या चित्रपटाचं बच्चनायझेशन केलं असेल तर ते दुर्दैवी आहे...>> कथेने खाल्लेला अमिताभ म्हणजे अमिताभ वेगळा उठुन दिसत नाही किवा कुणीही चालल असत तस असेल तर चित्रपट यशस्वीच आहे म्हणायच, अमिताभ वेगळा आणी जास्ती महत्वाचा असा दिसुन न येण म्हणजे समरसुन गेलाय असही म्ह्णणता येइल का? मुव्हि न बघितल्याने फार काही बोलण्यात पॉइन्ट नाही.
मॅनेरिझम बाबत फा शी सहमत , त्यामूले अमिताभ पिकुत खुप आवडला होता...कटकटा इरेटेटिन्ग म्हातारा परफेक्ट जमुन आला होता.
बेफीन्ची खत्न समजु शकते, आखखा पडदा व्यापुन उरणारा लार्जर दॅन लाइफ आता उरला नाही आणी त्याची जागा घेवु शकेल असही कुणी नाही.

अमिताभबद्दल सारेच बोलत आहेत. तुम्ही 'कथे'बद्दल बोलताय, आणि तीही अमिताभला 'खाणार्या' कथेबद्दल, हे (शीर्षकावरून) वाचून बरं वाटलेलं.
पण कथेबद्दल तुम्ही काही लिहिलेलंच नाही. सारं अमिताभबद्दल लिहून शीर्षकातली हवाच काढून घेतलीत.

तुम्ही अमिताभबद्दल बोललेलं देखील त्याच्यावर अन्याय करणारं आहे, विशेषत: शेवटच्या परिच्छछेदात. त्याचं महानायक कधीच होऊन झालं आहे. आता तो प्रयोग करतो आहे, ज्यासाठी ब्यकसीट घेणं आवश्यक असतं. कथेचं बळ आणि मोठेपण मान्य करणं आवश्यक असतं.

माझा हेतू अमिताभबद्दल लिहिण्याचा होता. ते माझे एक मत आहे. ते लिहिताना दोन चार ओळी कथेबद्दल लिहिल्या आहेत.

तुमच्या व सर्वांच्याच मतांचा प्रामाणिक आदर आहे.

माझे इतर ठिकाणचे मतप्रदर्शन, माझ्या लेखनाचे तुमच्यामते असलेले एकूण मूल्य अशा गोष्टी येथे अस्थानी वाटल्या इतकेच!

तुमचं मतप्रदर्शन आणि लिखाणाचं मुल्य हेही 'माझं मत' म्हणून सोडून द्या की.
बाकी, ते इथं लिहिणं हे अस्थानी ठरू शकतं याची कल्पना आहे आणि त्याबद्दल माफीही मागितली आहे. Happy

बरं Happy

ह्या धाग्या(मधे/वर) कोणाकडूनही का असेना, जे काही लिहिले गेलेले आहे ते अमिताभप्रेमापोटीच आहे असे वाटले.

बच्चन साहेबांच 'अमिताभ'पण कथेवर हावी होत नाही हीच मुळात हिंदी चित्रपटासाठी मोठी गोष्ट आहे...
एका अति प्रचलित व्यावसाइक व्युहरचनेतून बाहेर पडून हिंदी सिनेमा वेगळी वाट मळवायला घेतो आहे हे खूप आश्वासक आहे.

अभिनेता जेव्हा एखादी भूमिका करतो तेव्हा तो ते पात्र दिसायला हवा म्हणजे त्याने भूमिका चांगली केली असे म्हणता येते.

बेफिकीर म्हणताहेत की अमिताभ या अपेक्षेत कमी पडलेला नाही. पण जुन्या जमान्यातील उदा. जंजिरमध्ये ते अमिताभच्या जागी दुसऱ्या कुणाची जशी कल्पनाच करू शकत नव्हते तसे इथे होत नाही. इथे ती भूमिका इतर कुणी केली असती तरीही फारसा फरक पडला नसता.

हेच मत अजून कुणीतरी व्यक्त केलेले माबोवर वाचलंय.

केवळ हटके रोल असेल तरच तो अमिताभने करावा असे आपल्याला जरी वाटले तरी अमिताभला काय वाटते, त्याच्या गरजा काय आहेत व त्याला भूमिका देणाऱ्यांच्या गरजा काय आहेत हे आपल्याला माहीत नाही.

बेफिकीरनी रसग्रहण न लिहिता केवळ अमिताभबद्दल त्यांचे मत लिहिलेय. चित्रपटाबद्दल लिहिताना रसग्रहणसुद्धा लिहिले पाहिजे असे काही नसावे.

बेफि, परत लिहिते व्हा.
आणि भुक्कड आणि सनम पूर्ण करा.आम्ही काहीही शेवट असला तरी स्वीकारू.

बेफि, परत लिहिते व्हा.
आणि भुक्कड आणि सनम पूर्ण करा.आम्ही काहीही शेवट असला तरी स्वीकारू.+!११११११११११११११
अगदी मनातलं बोललात अनु Happy
तुम्हाला ३००% अनुमोदन

वाचक काय ! भुक्कडच तिकडे वाट बघत बसलाय बेफींची. Proud Light 1 बेफी खरच लिहा बाकी उरलेल्या कथा. अगदी एकेक करत लिहा. पण पूर्ण करा.

बेफी, काय म्हणायचंय ते कळलं नाही.
सिनेमा चांगला आहे. त्यात अमिताभ नसता कुणी दुसरं असतं तरी चाललं असतं असा मी अर्थ घेतला. असो.

अवांतर:
ही कथा पुर्ण करा. ते अमुक लेखन पुर्ण करा अशी लाडिक विनंती करणार्‍या मुलींनो,
त्यांना वेगळ्याच लेखनावर वेगळ्याच लेखनाबद्दल (जरी त्यांचंच लेखन असलं तरी) विचारलेलं आवडत नाही. Happy
लोक पण काय लिहिलंय ते न वाचता त्यावर प्रतिक्रिया न देता, मागचं काय अपुर्ण राहिलंय ते विचारत बसतात अशी लाडिक तक्रार त्यांनी कुठेशी केलेली आठवतंय. Light 1 घ्या बेफी़. Happy
मला तर सनम, अन्या, भुक्कड, कला पुर्ण होईल अशी आशा वाटत नाही. Sad

चित्रपट उत्तम रंगवत नेला आहे , कथा पकड घेत जाते, पण शेवट अजिबात रुचला अन पचला नाही ...
चविष्ट जेवणाच्या शेवटी काहीतरी बेचव पदार्थ यावा अन मूड ऑफ व्हावा तसे झाले.

त्यांना वेगळ्याच लेखनावर वेगळ्याच लेखनाबद्दल (जरी त्यांचंच लेखन असलं तरी) विचारलेलं आवडत नाही.>>>>
सस्मित तै, मग काय करावे?
कारण चित्रपट पाहिला नाही, पाहणार नाही

बेफी ह्यांचा लेख आहे, त्याबद्दल मी पामर काय बोलणार? Happy Happy
त्यात अमिताभ नसता कुणी दुसरं असतं तरी चाललं असतं असा मी अर्थ घेतला. +११११

बरं बरं.रिलेव्हन्ट प्रतिसाद देते.
मी असा अर्थ काढला की 'काम ठिके, पण खास अमिताभ टच जाणवला नाही.पूर्वी अमिताभ चे रोल फक्त अमिताभ नेच केलेले सूट व्हायचे.आता या पिक्चर मध्ये तो कोणीही केला तरी फरक जाणवणार नाही असे वाटते.
बदला बघणार नाही त्यामुळे काही मत नाही.
बाकी अमिताभ शी रिलेट केलेल्याना 'हे आज काय चाललंय' वाटू शकतं.नॅचरल आहे.

कथाच इतकी सशक्त आहे की बच्चन च्या जागी कोणीपण चाललं असतं असा अर्थ मी काढला. मला तो पटला. अत्यंत प्रेडिक्टेबल अभिनय. ठरीव आणि ठाशीव. मला तन्नु आवडत नाही कारण स त त एक मग्रुरी दिसते तिच्या चेहर्यावर. कोणत्याही सिनेमातला कोणताही प्रसंग आठवला तरी चेहर्यावरचे भाव तेच आणि तसेच वाटतात कायम. तन्नुप्रेमिंन्नो माफी असावी. Happy

सस्मित, किल्ली आणि इतर मान्यवर,

माझ्या पायाला गेली तीन वर्षे भिंगरी आहे

त्यामुळे जुन्या अर्ध्या राहिलेल्या कथा पूर्ण करण्याऐवजी मी नवीन लिहिण्याच्या मनस्थितीत आहे

मायबोलीने माझ्यावर प्रचंड उपकार केलेले आहेत त्यामुळे मी काही कथा लिहू शकलो, ज्यांचा संग्रह लवकरच येत आहे. श्रेय मायबोलीचेच आहे. तसे मी अर्थातच नमूदही करणार आहे संग्रहात!

पण नवीन लिहायला वेळ कमी मिळत आहे (काहीजण thank God म्हणतील :फिदी:).

पण शक्य तितक्या लवकर सक्रीय होण्याची इच्छा आहे

लोभ राहो

या धाग्यावरील अभिप्रायांसाठी सर्वांचे मनापासून आभार मानतो.

मला तन्नु आवडत नाही कारण स त त एक मग्रुरी दिसते तिच्या चेहर्यावर. कोणत्याही सिनेमातला कोणताही प्रसंग आठवला तरी चेहर्यावरचे भाव तेच आणि तसेच वाटतात कायम

अगदी अगदी, सेम हेच मत आहे तिच्याबद्दल.

पण शेवट अजिबात रुचला अन पचला नाही

होय, आणि नंतर विचार केल्यावर असे लक्षात येते की इतका सगळा उपद्वाप करून साध्य काहीच होत नाहीये.

स्पॉईलर अलर्ट - ज्यांनी पाहिला नाही त्यांना वाचू नये

तिच्याकडून वदवून घेण्यासाठी इतका मोठा खेळ रचला जातो पण ती इतकी तयारीची आहे की सहज कोर्टात सांगू शकेल की मला फसवून माझ्याकडून कबूलीजबाब घेतला गेला, वर्स्ट केस धमकावून. असेही त्या रेकॉर्डमध्ये तीने ३ वेगळ्या काल्पनिक कथा सांगितल्या आहेत. त्यातली कुठली खरी मानायची कोर्टाने.

गाडी बुडवल्याची जागाही खरी असेल असे कशावरून मानावे

आणि तो जो खरा वकील आहे, ज्याने आजवर एकही केस हरली नाहीये तो वाचवणारच कि तिला.

म्हणजे, यातून फक्त आत्मिक समाधान मिळाले की तिने कबूल केले, या पलिकडे काहीही नाही

>>आणि तो जो खरा वकील आहे, ज्याने आजवर एकही केस हरली नाहीये तो वाचवणारच कि तिला.<<

स्पॉयलर अलर्ट -
मूळ चित्रपटातच्या संदर्भावरुन; हिंदित (फ्रेम-बाय-फ्रेम रिप्रोड्युस केल्याचा दावा केलेला असुनहि) काय वाट लावली आहे त्याची क्ल्पना नाहि.

नायकाचा वकिल (अ) दुसर्‍या एका वकिलाला (ब) अपाँयट करतो जो कधीहि केस हरलेला नसतो. "अ" केस लढणारंच नसतो, तेंव्हा तो केस जिंकण/हारणं हा मुद्दा गौण आहे. आता "ब" ला ती केस हरण्यामागे रस का असतो, त्याचं कारण सांगत बसत नाहि... Wink

बरेच दिवसानी बेफि.
आता भुक्कड , सनम , अन्या पुर्ण करा!
एकच करायची असेल तर सनम वाचायला आवडेल.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट :

मला वाटतं की त्यांना आपल्या मृत मुलाला शोधण्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो. आईबापांना मुलाचा मृतदेह हवाय, नक्की काय घडलं त्याच्या बाबतीत हे समजून घ्यायचंय... त्यांना क्लोजर हवंय.

शिवाय पुढे कोर्टात जे काही होईल ते होवो, पण तिच्या तोंडून घडलेली घटना वदवून घेतलीये. तिनं सांगितलेल्या जागी मृतदेह मिळेल (तिनं योग्य जागा सांगितली हे गृहित धरून) तर तो देखिल एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो तिच्याविरुद्ध.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट :
मला बदला आवडला अगदी तापसी आणि अमृता सगळ्यांसकट.... शेवट मात्र थोडा पटला नाही. कारण एखादा साधा माणूस / मेकानिक हा कसलेल्या वकिलाची बरोबरी करू शकणार नाही.... म्हणजे ज्या पद्धतीचे जिगसॉ पझल सारखे संवाद अमिताभ आणि तापसी ला दिले आहेत, ते सामान्य माणसाला वेळेवर सुचणं शक्य नाही. तापसीचे एकवेळ ठीक आहे कारण ती स्वतःचा बचाव करायला बसली आहे सो शी इज रेडी. .म्हणून अमिताभ कदाचित तोच वकील पण अमृता सिंग चा भाऊ वगैरे दाखवला असता तर बॉलीवूडी पिक्चर झाला असता. फिदी फिदी.
अमिताभ च्या जागी कदाचित इरफान चालला असता पण ........ सॅड.

Pages