अलौकिक कवी

"कई बार यूं भी देखा है !"

Submitted by अशोक. on 2 January, 2013 - 22:38

काही जालीय मित्रांसमवेत मुकेशने गायलेल्या कित्येक सुमधुर गाण्यांच्या संदर्भात चर्चा चालू असताना राजकपूरशिवाय अन्य कोणकोणत्या अभिनेत्यासाठी मुकेशने पार्श्वगायन केले आहे याची यादी आठवत असतानाच त्यातील एका मित्राने त्याला मुकेशचे "रजनीगंधा" चित्रपटातील 'कई बार यूं भी देखा है...' हे गाणे खूप आवडीचे वाटत असल्याचे म्हटले. जे कोणत्याच अभिनेत्याच्या तोंडी नसून नायिकेच्या सैरभैर मनस्थितीच्या वर्णनासाठी पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटात या गाण्याचा मार्मिकपणे वापर केला गेला आहे. हे गाणे माझ्याही अत्यंत आवडीचे आहे.

विषय: 

अलौकिक कवी

Submitted by Kiran.. on 25 August, 2010 - 04:49

अलौकिक कवी

कवी हा कवी असतो
तो कविता करतो

तो जेवत नाही, झोपत नाही
काही खात नाही, काही पीत नाही

नित्यनेमाने कविता पाडत जातो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो

काही काही कवी मात्र अलौकिक असतात
ते जेवण करतात, जेवण करतात आणि
जेवण करतात
जेवल्यावर पुन्हा एकदा जेवतात

कुठेतरी इनपुट गेलं कि
कुठूनतरी आउट्पुट बाहेर येतो

डोक्याला कुठे भोक असतं ?
पोटाला असतं

जेवल्यावर मग पातळ पातळ कविता होतात
कधी कधी घट्टही असतात
असं झालं कि मग

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अलौकिक कवी