बलिप्रतिपदा
Submitted by Asu on 7 November, 2018 - 22:58
*बलिप्रतिपदा*
कार्तिक शुद्ध प्रतिपदेला
बलिप्रतिपदा सण हा आला
दिप पाडवा म्हणती याला
विक्रम संवत सुरू आजला
बळी अती दानशूर भला
वामने पाताळी तया धाडिला
परंतु देवे वर त्या दिधला
तीन दिसांचा राजा केला
पत्नी ओवाळिते पतिरायाला
नवदांपत्याचा सण माहेराला
करी आनंदी नव संसाराला
दिवाळसण म्हणती या दिसाला
सण दांपत्याचा दीपवातीचा
स्नेहे प्रीत ज्योत जळण्याचा
प्रेमाचा नित प्रकाश पसरुनि
नाती दिव्यासम उजळण्याचा
शब्दखुणा: