जोर लावून लावून मी थकलो पण ......................

चिरुमाला (भाग १३)

Submitted by मिरिंडा on 28 August, 2018 - 03:53

जोर लावून लावून मी थकलो पण कडी रेसभरही हलली नाही. शेवटी जुनं काम होतं. अर्थात मी आत्ता त्या गोष्टीचं कौतुक करण्याच्या मनः स्थितीत नव्हतो. थंडी असूनही माझ्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या. मग दुसऱ्या बाजूने पण प्रयत्न करून पाहिला पण कडी ढिम्म हालेना. मग मी कंटाळून पहार तिकडेच टाकली. जरा दम खाण्यासाठी बसलो., पण उकिडवा. खाली फरशी असावी . ती बरीच जुनी असल्याने खडकासारखी भासत होती. पायऱ्यांवर बसण्याची सोय नव्हती . माझा एक हात लाकडी पेटी वर होता. आपण दुसरं कोणाची मदत घ्यावी का असा विचार माझ्या मनात आला. कोणाची मदत घेणार ? जुडेकर , गोळे , की पै ? जुडेकरवर विश्वास वेताचा होता.

Subscribe to RSS - जोर लावून लावून मी थकलो पण ......................