जरा पाऊस पडला की

जरा पाऊस पडला की

Submitted by बेफ़िकीर on 12 July, 2018 - 04:33

गझल - जरा पाऊस पडला की
====

जरी धुंदीमधे असते, जरा पाऊस पडला की
मला पाहून ती हसते, जरा पाऊस पडला की

रजा नाही मिळाली तर सरळ मारायची दांडी
सहल काढायची असते, जरा पाऊस पडला की

बिचारी एरवी तिष्ठून असते लोचनांमध्ये
गझल पेल्यात फसफसते, जरा पाऊस पडला की

कुणी ऑफिसमधे अडके, कुणी लोकलमधे लटके
कुणी जाळ्यातही फसते, जरा पाऊस पडला की

कुणी उत्साह दाखवते नि मग कामावरी जाते
कुणी हासून आळसते, जरा पाऊस पडला की

मनाचे काय!! त्याचा मूड कोठे सांगता येतो
कुणावरही खुळे बसते, जरा पाऊस पडला की

Subscribe to RSS - जरा पाऊस पडला की