जरा पाऊस पडला की

Submitted by बेफ़िकीर on 12 July, 2018 - 04:33

गझल - जरा पाऊस पडला की
====

जरी धुंदीमधे असते, जरा पाऊस पडला की
मला पाहून ती हसते, जरा पाऊस पडला की

रजा नाही मिळाली तर सरळ मारायची दांडी
सहल काढायची असते, जरा पाऊस पडला की

बिचारी एरवी तिष्ठून असते लोचनांमध्ये
गझल पेल्यात फसफसते, जरा पाऊस पडला की

कुणी ऑफिसमधे अडके, कुणी लोकलमधे लटके
कुणी जाळ्यातही फसते, जरा पाऊस पडला की

कुणी उत्साह दाखवते नि मग कामावरी जाते
कुणी हासून आळसते, जरा पाऊस पडला की

मनाचे काय!! त्याचा मूड कोठे सांगता येतो
कुणावरही खुळे बसते, जरा पाऊस पडला की

मला ती ऐन मोक्याच्या क्षणी सांगायला बसते
असे बरसायचे नसते, जरा पाऊस पडला की

मुलायम सोबतीसाठी मुलायम वाट दिसते का
हुडकतो 'बेफिकिर'रस्ते, जरा पाऊस पडला की

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट!
सर्व शेर मस्त आहेत,

पण

मनाचे काय!! त्याचा मूड कोठे सांगता येतो
कुणावरही खुळे बसते, जरा पाऊस पडला की >> हा खासम खास आहे एकदम. आवडेशच! Happy

पुलेशु!

दक्षिणा, सरळ दक्षे म्हणू का? म्हणतोच. बेफींच्या कविता, गझल बघ. भारीच. पण ही नाही. तुम्हाला काही शेर अपिल झाले असतील तर असो बापडे. बेफिकीर यांचे शेर तोंडपाठ आहेत.

अहा! मतला सहज खास!
>>>गझल पेल्यात फसफसते,जरा पाऊस पडला की>>>सुंदर!

>>>मनाचे काय? कुणावरही खुळे बसते>>>खासंच!

आवडली..

सहल काढायची असते, जरा पाऊस पडला की

गझल पेल्यात फसफसते,जरा पाऊस पडला की..

मनाचे काय? कुणावरही खुळे बसते, जरा पाऊस पडला की.. हे विशेष आवडले...!