फिनलँड भाग १

हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग १

Submitted by निर्झरा on 6 July, 2018 - 05:21

अगदी सुरुवातीपासून सांगायचे झाले, तर नवरा कामानिमित्त फिनलँड येथे गेला आणि मग आमचे, म्हणजे माझे आणि मुलाचे तिकडे जाण्याचे ठरले. तयारी सुरु झाली. नवर्‍याची कंपनी जरी सगळ करणार होती तरी एवढा लांबचा प्रवास एकटीने करण्याचे धाडस मलाच करायचे होते. आता तुम्ही म्हणाल त्यात एवढ काय? पण माझ्या बाबतीत खरी गंमत ही की माझा आणि ईंग्रजी भाषेचा शाळेत असल्यापासून छत्तीसचा आकडा आहे तो अजूनही आहे. त्यात पुण्याच्या डेक्कन परिसराहून अधिक लांब कुठेच एकटी फिरले न्हवते. त्यामुळे माझ्या समोर पहिला प्रश्न होता तो एकटीने प्रवास करण्याचा आणि व्हिसा ऑफिस मधे समोरच्या माणसा बरोबर मी काय आणि कसे बोलणार याचा.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फिनलँड भाग १