वानगी (शतशब्दकथा)

वानगी (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 24 June, 2018 - 02:55

‘अग, रिटा ना ती?’ पूनम प्रियाला कुजबुजत म्हणाली.
‘हो'
‘अशी काय दिसतेय मग? डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केसात पांढर्या बटा. चेहेरा किती ओढलेला दिसतोय'
‘म्हणजे? तुला माहित नाही?’
‘काय?’
‘मागच्याच महिन्यात तिचा नवरा गेला'
‘अग बाई, कशाने?’
‘अंथरुणाला खिळून होता म्हणे किती वर्षं. साठीच्या पुढचाच होता'
‘मग सुटली म्हणायची की'
‘तिचं प्रेम असेल त्याच्यावर. नवरा असताना किती टापटीप रहायची - मेकअप, हेअरस्टाईल, परफ्युम. चाळीशीतली आहे असं वाटायचं पण नाही.’
'तुला माहित आहे.....परचेसमधला विवेक खुश आहे तिच्यावर.’

Subscribe to RSS - वानगी (शतशब्दकथा)