Submitted by स्वप्ना_राज on 24 June, 2018 - 02:55
‘अग, रिटा ना ती?’ पूनम प्रियाला कुजबुजत म्हणाली.
‘हो'
‘अशी काय दिसतेय मग? डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केसात पांढर्या बटा. चेहेरा किती ओढलेला दिसतोय'
‘म्हणजे? तुला माहित नाही?’
‘काय?’
‘मागच्याच महिन्यात तिचा नवरा गेला'
‘अग बाई, कशाने?’
‘अंथरुणाला खिळून होता म्हणे किती वर्षं. साठीच्या पुढचाच होता'
‘मग सुटली म्हणायची की'
‘तिचं प्रेम असेल त्याच्यावर. नवरा असताना किती टापटीप रहायची - मेकअप, हेअरस्टाईल, परफ्युम. चाळीशीतली आहे असं वाटायचं पण नाही.’
'तुला माहित आहे.....परचेसमधला विवेक खुश आहे तिच्यावर.’
रिटा मात्र विचार करत होती 'रमेश गेल्यावर पुढचं सावज लगेच मिळालं की. आता मी पुन्हा तरुण दिसू शकेन. कोण म्हणतं ययातीची गोष्ट पुराणातली वानगी आहे?’
---
डिस्क्लेमरः कॄपया एक कथा म्हणून वाचावी. तसंच अंधश्रध्दा पसरवण्याचा हेतू नाही ह्याची नोंद घ्यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयडिया भारी सुचतात तुला !!
आयडिया भारी सुचतात तुला !!
भारीच आयडिया!
भारीच आयडिया!
मस्त असतात तुमच्या शशक☺️
मस्त असतात तुमच्या शशक☺️
पुलेशु☺️
छान.
छान.
ट्विस्ट आवडला
ट्विस्ट आवडला
छान कल्पना,
छान कल्पना,
तेवढं वानगीचं वांगी करून घ्या!
पुराणातली वानगी (उदाहरण) असेच
पुराणातली वानगी (उदाहरण) पुराणात ... असेच आहे वाकप्रचार
घाईत बोलताना ते वांगी ऐकू येत असेल
______________
खुप छान आहे हां ट्विस्ट
मस्त शशक
हो, आता शोध घेतल्यावर कळलं की
हो, आता शोध घेतल्यावर कळलं की ते वानगी आहे, आम्ही आपले स्कॉलरशिपच्या पुस्तकांवर विश्वास ठेवून वांगीच म्हणत (आणि लिहत) होतो!
ती ययाती.
ती ययाती.
मस्तच. आवडली.
वानगी आहे होय ते मी पण वांगीच समजत होते अजुन.
(No subject)
भारिच्चे गोष्ट
भारिच्चे गोष्ट
मस्त जमली आहे. भारी आयडीया!!
मस्त जमली आहे. भारी आयडीया!!
हो, आता शोध घेतल्यावर कळलं की
हो, आता शोध घेतल्यावर कळलं की ते वानगी आहे, आम्ही आपले स्कॉलरशिपच्या पुस्तकांवर विश्वास ठेवून वांगीच म्हणत (आणि लिहत) होतो!+१११
मस्त शशक
भारी!
भारी!
छान!
छान!
सहीच!
सहीच!
राव पाटील, सस्मित, किल्ली -
राव पाटील, सस्मित, किल्ली - मलासुध्दा आत्ताआत्तापर्यंत ते 'वांगी' आहे असंच वाटत होतं. मग लोकसत्तातल्या एका लेखात उल्लेख 'वानगी' असा वाचला. आणि वानगी = उदाहरण हे लक्षात येऊन ट्यूब पेटली
वेळ काढून कथा वाचल्याबद्दल आणि प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार!! तुम्ही वाचताय म्हणून लिहायची हिंमत करतेय. काही चुकत असेल तर सांगायला विसरू नका.
वाह!!!!!!!
वाह!!!!!!!
मस्त कथा... आवडली.
मस्त कथा... आवडली.
ज्ञानात भर : पक्षी - वानगी — घातल्याबद्दल आभार
मस्त कथा... आवडली
मस्त कथा... आवडली
छान!
छान!
मस्तच!
मस्तच!
मला तर ते "पूरणातली वान्गी"
मला तर ते "पूरणातली वान्गी" वाटायचे.. "पूराणातली वानगी" असते हे आ त्ताच कळले