अक्षी येथील गद्धेगळ (भाग-१) [Ass- Curse stone Akshee part-1]
Submitted by shantanu paranjpe on 20 June, 2018 - 13:53
द्धेगळ वर वाचल्यानंतर बरेच दिवस आक्षीला जायचे मनात होते पण बेत काही जमत नव्हता, पण दिवाळीच्या निमित्ताने तिकडे जाता आले आणि बर्यापैकी सुस्थितीत असलेली गद्धेगळ पाहायला मिळाले. तर आजचा लेख हा त्याच गद्धेगळ वर!
सुरुवात करण्यापूर्वी अक्षी गावाची थोडी माहिती सांगतो! अक्षी हे गाव अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर, अलिबाग पासून साधारण ६ किमी अंतरावर असलेले हे गाव ओळखले जाते ते त्याच्या सुंदर समुद्र किनार्यामुळे. शनिवार-रविवार ओसंडून गर्दी असलेला हा परिसर इतर दिवशी मात्र शांत असतो. नारळ-पोफळीच्या वाड्या, प्रेमळ माणसे आणि भरभरून इतिहास असणारा हा प्रदेश कोणत्याही भटक्याला भुरळ पडतो.