ज्येष्ठ

ज्येष्ठ

Submitted by पुरंदरे शशांक on 29 May, 2018 - 01:03

ज्येष्ठ

ऋतूचक्राच्या आर्‍यात
ज्येष्ठ संधीकाली उभा
आग ओकूनी थकला
झाकोळती मेघ नभा

रानावनात पालवी
हिरवाई किती छटा
सुगंधात लपेटूनी
अनवट रानवाटा

लख्ख मोकळ्या आकाशी
वावटळ उठे दूर
त्याच्या आठवांनी दाटे
मनी काहूर काहूर

मेघ उमटती नभी
गहिरेसे भले मोठे
झुंजी घेती एकमेका
आभाळाचा पट फाटे

ज्येष्ठ तापता तापता
मन काहिली काहिली
येता वळवाची सर
मरगळ दूर झाली...

Subscribe to RSS - ज्येष्ठ