जरा-जरा

--जरा-जरा--

Submitted by Nilesh Patil on 25 November, 2018 - 12:19

--जरा-जरा--

सराव हा हसण्याचा करतोय जरा-जरा,
जगूनही असा आता मरतोय जरा-जरा..।

येते हे दुखणे रोज-रोजचे जगण्यात,
त्यांना मी सहन सहज करतोय जरा-जरा..।

थांबेल ही वाट जीवनाची कधीतरी जगतांना,
निसतंटय जिवन क्षणिक कणांपरी जरा-जरा..।

लावल्या मी मशाली ह्या जीवनात माझ्या,
ज्योतही जीवनाची अशी विझतेय जरा-जरा..।

जवळचे ही आता दूर जाताय मजपासून,
सावलीही साथ माझी सोडतेय जरा-जरा..।

एकटाच मी निघालोय माझ्या या मार्गावर,
एकटाच मी आता पडतोय जरा-जरा..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--

विषय: 
शब्दखुणा: 

--जरा-जरा--

Submitted by Nilesh Patil on 6 May, 2018 - 13:16

*--जरा-जरा--*

होतोय मज सराव हसण्याचा जरा-जरा..।
चंद्र आणि ताऱ्यांशी बोलण्याचा जरा-जरा..।

लागली आता समाधी या उसळत्या सागराला,
यात आता सराव पोहण्याचा जरा-जरा..।

दिशादिशात घुमतोय गाज या सागराचा,
मानूनी हाक यास समजतोय जरा-जरा..।

बराच झाला प्रयत्न हात धरून चालण्याचा,
(पडून पुन्हा आता सांभाळतोय जरा-जरा..।)

--निलेश पाटील--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो--9503374833--

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जरा-जरा