दंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना

दंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना

Submitted by बेफ़िकीर on 11 April, 2018 - 12:20

गझल - दंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना (११.०४.२०१८)

दंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना
कण्यास मिरवावयास आधी कणा हवा ना

तुला समजण्यासाठीही नाहीस पुरेसा
मला समजण्यासाठी चांगुलपणा हवा ना

चिमणाळ्याचे आरक्षण मागतोस नुसते
कर्तृत्वाचा एखादा पाळणा हवा ना

दात तुला आलेत तुझ्या वशिल्याने सध्या
वशिला नाही त्यांनासुद्धा चणा हवा ना

कुणीतरी 'बेफिकीर' होऊन साद घालो
तुझ्यात सच्चेपणा असा जाग्रणा हवा ना

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - दंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना