दंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना

Submitted by बेफ़िकीर on 11 April, 2018 - 12:20

गझल - दंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना (११.०४.२०१८)

दंश वगैरे करण्यासाठी फणा हवा ना
कण्यास मिरवावयास आधी कणा हवा ना

तुला समजण्यासाठीही नाहीस पुरेसा
मला समजण्यासाठी चांगुलपणा हवा ना

चिमणाळ्याचे आरक्षण मागतोस नुसते
कर्तृत्वाचा एखादा पाळणा हवा ना

दात तुला आलेत तुझ्या वशिल्याने सध्या
वशिला नाही त्यांनासुद्धा चणा हवा ना

कुणीतरी 'बेफिकीर' होऊन साद घालो
तुझ्यात सच्चेपणा असा जाग्रणा हवा ना

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला समजण्यासाठी चांगुलपणा हवा ना ..... मस्त!!

<<< दात तुला आलेत तुझ्या वशिल्याने सध्या
वशिला नाही त्यांनासुद्धा चणा हवा ना >>>
आता हा धागा आरक्षणाच्या दिशेने नेऊन त्याचे पानिपत केले नाही म्हणजे नशीब.

आरक्षणाच्या दिशेने नेऊन?
वरच्या "फण्या"तून ओकलंय ते गरळ कोणत्या दिशेचं आहे म्हणे नक्की?
मुद्दलातच फ्रस्ट्रेशन आहे इथे.
"ये नीचले स्तर के लोग हमारी बराबरी कैसे कर रहे?" ही जी "टी सिरीज" सध्या यूपी मधे सुरू आहे, त्याचेच हे मराठमोळे रूप.