शेंगा आणि टरफले

शेंगा आणि टरफले

Submitted by आशूडी on 20 February, 2018 - 13:47

लोकमान्य टिळकांची सुप्रसिद्ध गोष्ट आपण ऐकली असेलच. "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" हे ज्या बाणेदारपणे त्यांनी निक्षून (बाणेदारपणे हे नेहमी निक्षूनच असते किंवा जे निक्षून असते ते बाणेदारच असते) सांगितले तो बाणेदारपणा आजकाल कमी होत चालला आहे असे निरीक्षणात आले आहे. पूर्वी मराठी हिंदी सिनेमात तो बाणेदारपणा अगदी ठासून भरलेला असे उदा. विश्वासराव सरपोतदार कसे आठवणीने सत्तर रुपये परत मागतात किंवा जब तक बैठने के लिए ना कहा जाए चुपचाप खडे रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही - आठवलं तरी वाटतं की नंतर प्राण एकटा असतानाही खुर्चीवर बसत नसेल.

Subscribe to RSS - शेंगा आणि टरफले