बुढ्ढा मिल गया

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - ५. बुढ्ढा मिल गया (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 6 February, 2018 - 09:55

काय वाटतं चित्रपटाचं नाव वाचून? 'मै क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया' हे गाणं ऐकलं असेल तर असंच वाटतं ना की तारुण्याने मुसमुसलेल्या एखाद्या तरुणीचं लग्न तिच्याहून वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी झाल्यावर तिने वैतागून काढलेले हे उद्गार असतील? पण मग ही तरुणी कोण आणि बुढ्ढा कोण? चित्रपटातल्या गाण्यात उदा. ‘रातकली एक ख्वाबमे आई' तर हिरोईनसोबत तरुण नवीन निश्चोल दिसतो. अर्थात 'आयो कहासे घनश्याम' हे गाणं पाहिलं तर त्यात तिच्यासोबत ओमप्रकाशही दिसतो. हा तो बुढ्ढा का काय? पण मग त्याच्या चेहेर्यावर जे प्रेमळ भाव दिसतात त्याची टोटल कशी लावायची?

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बुढ्ढा मिल गया