उशीर (लावणी)

उशीर (लावणी)

Submitted by मकरन्द वळे on 21 January, 2018 - 01:44

उशीर (लावणी)
चांद विझला एकली झुरे रोहिणी
रात सरून गेली मोहक तरणी
जाई जुई सुधा कोमेजली अंगणी
आज तुम्ही का उशीर लावला धनी..१♦️

साज शिणगार लाडे लाडे केला
शालु मोरपंखी बुट्टेदार ल्याला
गुज सांगु कधी जे रुंजी घालते मनी
आज तुम्ही का उशीर लावला धनी..२♦️

किती दिसात रंगला नाही विडा
नाही पिचला अजुन माझा चुडा
भाव प्रितीचा दाटून आला नयनी
आज तुम्ही का उशीर लावला धनी ..३♦️

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उशीर   (लावणी)