उशीर (लावणी)

Submitted by मकरन्द वळे on 21 January, 2018 - 01:44

उशीर (लावणी)
चांद विझला एकली झुरे रोहिणी
रात सरून गेली मोहक तरणी
जाई जुई सुधा कोमेजली अंगणी
आज तुम्ही का उशीर लावला धनी..१♦️

साज शिणगार लाडे लाडे केला
शालु मोरपंखी बुट्टेदार ल्याला
गुज सांगु कधी जे रुंजी घालते मनी
आज तुम्ही का उशीर लावला धनी..२♦️

किती दिसात रंगला नाही विडा
नाही पिचला अजुन माझा चुडा
भाव प्रितीचा दाटून आला नयनी
आज तुम्ही का उशीर लावला धनी ..३♦️

अत्तराचा गंध सारा विरून गेला हवेत
जिव आसुसला येण्या तुमच्या कवेत
कशी हिरमुसली हो शुक्राची चांदणी
आज तुम्ही का उशीर लावला धनी ..४♦️

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users