इसम - पाल

इसम - पाल

Submitted by बेफ़िकीर on 5 January, 2018 - 01:42

ट्रक पालला पोचला. ट्रकमध्ये इसम असल्याने इसमही पालला पोचला. आपण पालला पोचलो आहोत हे इसमला माहीत नव्हते. पालला एका बाजूला ट्रक थांबल्यावर इसम उडी टाकून खाली उतरला आणि ड्रायव्हरला भेटला आणि म्हणाला किती झाले. ड्रायव्हरला इसम आपल्या ट्रकमध्ये होता हेच माहीत नव्हते. त्यामुळे ड्रायव्हर अचंबीत झाला. ड्रायव्हरने विचारले कुठे बसला. इसम म्हणाला आलोक ढाब्याबाहेर. ड्रायव्हरने चाळीस रुपये मागीतले. इसमने वीस रुपये देऊ केले व म्हणाला की त्याने सांगितलेच नसते आणि उतरून पळून गेला असता तर ड्रायव्हरला काहीच मिळाले नसते त्यापेक्षा वीस रुपये बरे. ड्रायव्हरने वाद काढला. इसम ठाम राहिला.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - इसम - पाल