पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१८

यंदाचा 'पिफ' ११ ते १८ जानेवारीदरम्यान

Submitted by चिनूक्स on 18 December, 2017 - 13:25

तर, यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होणारा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' यंदा ११ ते १८ जानेवारी, २०१८दरम्यान होणार आहे. यंदा या महोत्सवाचं हे सोळावं वर्ष आहे. या वर्षी महोत्सवात अडीचशेहून अधिक चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे चित्रपटांबरोबरच अनेक कार्यशाळा, चर्चासत्रं, प्रदर्शनं यांचा अंतर्भावही महोत्सवात असेल.

विषय: 
Subscribe to RSS - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१८