यंदाचा 'पिफ' ११ ते १८ जानेवारीदरम्यान

Submitted by चिनूक्स on 18 December, 2017 - 13:25

तर, यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होणारा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' यंदा ११ ते १८ जानेवारी, २०१८दरम्यान होणार आहे. यंदा या महोत्सवाचं हे सोळावं वर्ष आहे. या वर्षी महोत्सवात अडीचशेहून अधिक चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे चित्रपटांबरोबरच अनेक कार्यशाळा, चर्चासत्रं, प्रदर्शनं यांचा अंतर्भावही महोत्सवात असेल.

यावर्षी सोळाव्या वर्षात पदार्पण करणार्‍या 'पिफ'ची मध्यवर्ती संकल्पना 'तरुणाई' ही आहे. महोत्सवातल्या 'सिंहावलोकन' या विशेष विभागात यंदा मूळचे स्वीडनचे दिग्दर्शक व निर्माते इन्गमार बर्गमन आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. बर्गमन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून आवर्जून 'सिंहावलोकन' विभागात त्यांच्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.

जागतिक स्पर्धाविभागात १४ चित्रपटांचा समावेश आहे. यावर्षी ९१ देशांमधून १००८ चित्रपट महोत्सवातल्या स्पर्धेसाठी पाठवले गेले. त्यांपैकी हे निवडक चौदा चित्रपट आहेत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे -

अनुक्रमांक. इंग्रजी नाव (मूळ नाव) - दिग्दर्शक - निर्माते देश

१. I am nobody (Bir Şey Değilim), Director - Muharrem Özabat, Country – Turkey

२. REQUIEM FOR MRS. J (Rekvijem za gospodju J), Director - Bojan VULETIC, Country – Serbia

३. FREE AND EASY, Director - JUN GENG, Country – China

http://www.sundance.org/projects/free-and-easy

४. WOMEN OF THE WEEPING RIVER, Director - Sheron Dayoc, Country – Philippines & France

५. EUTHANIZER ('Armomurhaaja'), Director - Teemu Nikki, Country – FINLAND

६. Goliath, Director - Dominik Locher, Country – SWITZERLAND

७. THE LONGING, Director - Joram LÜRSEN, Country – NETHERLAND

८. ZAMA, Director - Lucrecia martel, Country – Argentina, Brazil, Spain, France, Netherlands, Portugal, Mexico, USA

९. MORE (Daha), Director - Onur SAYLAK, Country – TURKEY

१०. The Nothing Factory, Director - Pedro Pinho, Country – PORTUGAL

११. I'M A KILLER (Jestem Morderca), Director - Maciej PIEPRZYCA, Country – POLAND

१२. Djam, Director - TONY GATLIF, Country – TURKEY, GREECE, FRANCE

१३. The Quartette, Director - Miroslav Krobot, Country - Czech Republic

१४. NOCTURNAL TIMES (Pathirakalam), Director – PRIYANANDANAN TR , Country - INDIA

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवड इथे सहा चित्रपटगृहांमध्ये बारा पडद्यांवर महोत्सवातले चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी, 'फिल्म क्लब'चे सभासद व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी महोत्सवाचं शुल्क रु. ६०० असून इतरांसाठी ते रु. ८०० इतकं आहे.

महोत्सवातल्या इतर विभागांची आणि चित्रपटांची घोषणा लवकरच केली जाईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users