लेहच्या ११००० फुटावर ४-५ दिवसांच्या वास्तव्यात रात्री सुद्धा काही थंडी लागली नव्हती. काल रात्री मात्र सरचूला आलो तेंव्हा बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. तरी सुद्धा १५००० फुटावर रात्री जाणवायला हवी इतकी काही जाणवली नाही. पहाटे सर्वजण उठले तेंव्हा मात्र बऱ्याच जणांना थंडी जाणवत होती. मला मात्र तसे काहीच वाटत नव्हते. का कोण जाणे... असो. सकाळी ६ वाजता नित्यनियमाने आवराआवरी केली आणि आमच्या नाश्त्याआधी बाईक्सना सुद्धा नाश्ता देणे आवश्यक आहे हे कळून आले. खास करून अमेय आणि कुलदीप यांच्या बाईक्स पेट्रोल पित होत्या. तेंव्हा आदित्य पेट्रोल आणायला ड्रायव्हरला घेउन परत १० किमी. मागे गेला.
मोहिमेच्या ९ व्या दिवशी अखेर आम्ही लेह सोडून परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. जम्मू ते लेह ह्या ४ दिवसाच्या आणि लेहमधील ४ अश्या एकुण ८ दिवसात अनेक अनुभव घेउन आम्ही मनालीमार्गे दिल्लीसाठी निघालो होतो. गेल्या ८ दिवसात कारगिल - द्रास, नुब्रा - खर्दुंग-ला, पेंगोंग - चांग-ला अश्या अनेक ठिकाणी भेट देऊन तृप्त झालेले आम्ही आता 'त्सो-मोरिरी'कडे निघालो होतो. वाकड्या मार्गाने पुन्हा एकदा चीन सीमारेषेवर जायचे आणि मग तिकडून 'त्सो-कार'च्या रस्त्याने खाली सरचूला उतरायचे असे आमचे ठरले होते.
दिनांक १६ ऑगस्ट. मोहिमेचा दिवस नववा. आजचे लक्ष्य होते १८३८० फूटावरील जगातील सर्वोच्च रस्ता - खर्दुंग-ला. खुद्द स्वतःला आणि स्वतःच्या बाईकला सुद्धा तिथपर्यंत नेण्यासाठी सर्वजण आसुसलेले होते. या मोहिमेमध्ये अनेक अनुभव आले, येत होते पण हा अनुभव सर्वोच्च असणार होता याची प्रत्येकाला खात्री होती. आज आमचे ते स्वप्न पूर्ण होणार होते. सकाळी नाश्ता करून लेह सोडले तेंव्हा पासून मनात एक वेगळीच बेधुंद लहर संचारली होती. खाली येउन लेह मार्केटमध्ये न शिरता मागच्या बाजूने थेट 'खर्दुंग-ला'च्या वाटेला लागलो.
स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाने कालचा थकवा आणि शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. कालच्या दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री उशिराने झोपून देखील सर्वजण ७:३० वाजता निघायला हजर होते. हलकासा नाश्ता केला आणि पोलो ग्राउंडकडे निघालो. लेह मार्केटच्या थोड वरच्या बाजूला आहे हे पोलो ग्राउंड. फार मोठे नाही आहे पण ह्या सोहळ्यासाठी पुरेसे असे आहे. जम्मू-काश्मिरप्रमाणे इकडे परिस्थिति नसल्याने तशी फारशी सिक्युरिटी नव्हती. झेंडा वंदनासाठी विविध दलाचे, अनेक शाळा-कोलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रिय छात्र सेनेचे कडेट्स त्यांच्या बर्रेटवरच्या लाल हायकलमध्ये उठून दिसत होते.
कालच्या थोड्या विश्रांतीच्या दिवसानंतर लडाखमध्ये समरस होत आलो होतो. आज एक मोठे लक्ष्य गाठायचे होते. जगातील तिसरा सर्वोच्च रस्ता 'चांग-ला' (१७५८६ फुट) फत्ते करून भारत - चीन सीमेवरील 'पेंगॉँग-सो'चे सौंदर्य अनुभवायचे होते. 'सो' (त्सो) म्हणजे तलाव. लडाखमधल्या प्रेक्षणीय स्थळापैकी महत्वाचा असा हा लेक आज आम्ही बघणार होतो. पहाटे-पहाटे ४:३० वाजता उठलो आणि आवरा-आवरी केली. चहा-कॉफी बरोबर ब्रेड-बटर पोटात ढकलले. ५ ला निघायचे होते ना. पण सर्वांचे आवरून गेस्टहाउस वरुन निघायला ५:४५ झाले. तसा फ़क्त ४५ मिं. उशीर झाला होता पण ही ४५ मिं. आम्हाला चांगलीच महागात पडणार होती. का म्हणताय...
आज बरेच दिवसांनंतर तसा थोडा निवांतपणा होता. ना लवकर उठून कुठे सुटायचे होते ना कुठे पुढच्या मुक्कामाला पोचायचे होते. काल रात्री लेहला आल्यापासून जरा जास्त बोललो किंवा जिने चढ-उतर केले की लगेच दम लागत होता. रात्री नुसते सामान खोलीमध्ये टाकेपर्यंत धाप लागली होती. येथे आल्यानंतर वातावरणाशी समरस होणे अतिशय आवश्यक असते. आल्याआल्या उगाच दग-दग केल्यास प्राणवायूच्या कमतरतेने प्रचंड दम लागणे, डोके जड होणे असे प्रकार घडू शकतात. तेंव्हा आल्यावर थोडी विश्रांती गरजेची असते.
आज होता मोहिमेचा चौथा दिवस. सकाळी ६ वाजता ठरल्याप्रमाणे सर्वजण द्रासवरुन लेहकडे कुच झाले. आज कारगीलमार्गे 'नमिके-ला' आणि 'फोटू-ला' असे २ पास फत्ते करत लेहच्या पठारावर उतरायचे होते. जम्मूपासून निघालेले आम्ही १५ वेडे अथकपणे ५०९ की.मी.चे अंतर पार करत आपल्या लक्ष्याकडे झेप घेत होतो. आजचे अंतर होते ३१९ की.मी. आणि हे अंतर आज आम्ही काहीही झाले तरी गाठणार होतोच. आज पुन्हा एकदा मी आणि अमेय साळवी सर्वात पुढे सुटलो. पहिले लक्ष्य होते द्रासपासून ५७ की.मी.वर असणारे कारगील.