लेहवरनं मनालीला येताना डिब्रिंग नावाच्या गावात नुकताच टांगलांग ला संपतो, इथे तुम्ही उजवीकडे वळलात की त्सो कारचा कट आहे. आम्ही ह्या गावात डावीकडे वळून मनालीच्या रस्त्यावर लागलो. इथे जेवायला फारसे काही उपलब्ध नाही. गाव म्हणजे फारतर दोन पाच घर असावीत. ते गाव असेल हे कळत नाही. इथून पुढे लिंजडरी मूर प्लेन्स सुरू होते. मूर प्लेन्स हा साधारण ३५ किमीचा रोड आहे. त्याचे नाव प्लेन्स का? तर मनाली ते लेह ह्या संपूर्ण रस्त्यावर इतका सरळ रस्ता आणि इतके किमी दुसरा कुठलाही नाही. तुम्ही नेहमीच डोंगर दर्यातून जात असताना अचानक लेह-मनाली चा अर्धा रस्ता पार केला की मूर प्लेन्स लागते.
माझ्या मुळ प्लान मध्ये मी लेह एकदा सोडल्यावर परत येणार नव्हतो. तर मधील अनेक शॉर्टकटस आणि थोडे अवघड रस्ते घेऊन पुढे पँगाँग त्सो आणि मग तेथून मान, मेरेक त्सागा ला / काकासांगला ( जे की खरे हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड आहेत) ते घेऊन पुढे त्सो मोरिरी आणि मग तेथूनच व्हाया त्सो कार, पँग ते मनाली असा होता.
मुळ प्लान.

लेहचा एक चांगला भाग म्हणजे चंगंस्पा मार्केट. ह्या मार्केट मध्ये निदान एकदा तरी गेल्याशिवाय लेह पूर्ण होत नाही. विविध दुकानात विविध वस्तू मिळतात. पण इथे तुम्हाला अनेक बाईक आणि सायकल रेन्टल दुकानेही दिसतील. इथे एक तरी संध्याकाळ राखून ठेवायलाच हवी.
बाय बाय फॅमिली एन्टर ग्रूप !
आजचा मुक्काम अर्थातच लेह होता. कारगिल ते लेह २१६ किमी आहे.

माउंटेन्स टेक टोल, ऑन बॉडी अॅन्ड ऑन सोल !
आजचा प्लान होता बटिंडा ते श्रीनगर!

For some the destination matters more than the journey and for me the journey mattered more than the destination.
लेह ला जायचे अनेक मुख्य दोन मार्ग. एक विमान मार्ग. दिल्ली वा श्रीनगर वरून विमान सेवा उपलब्ध आहे. व दुसरा म्हणजे रोड. रोड मध्येही लेहला दोन मार्गांनी जाता येते. एक श्रीनगर-कारगील-लेह ( ४१६ किमी) किंवा दुसरा मनाली-लेह ( ४७४ किमी). दोन्ही रस्त्यांना जे कव्हर करतात त्यांना आपण फूल सर्किट ( पन इंटेडेड) कव्हर करणारे लो़कं म्ह्णू. द फुल सर्किट म्हणजे एकतर श्रीनगर-लेह-मनाली उलटे म्हणजे मनाली-लेह-श्रीनगर.
गॉट लेह्ड ! लेह लडाख ! गेले अनेक वर्षे जिथे जायची इच्छा ( ३ इडियटच्या आधीपासून) होती ती जागा! १९९९-२००० च्या छोट्या युद्धामुळे जगात सगळ्यांना कारगिल माहिती झाले ते लडाख! हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! द लामा लॅण्ड ! द रूफ ऑफ द वल्ड !
ही लेखमालिका आजच्या ह्या पोस्टने संपतोय. खरे सांगायचे तर ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत. 