शून्यमात्र

असेच मी कधी तरी...

Submitted by पुरंदरे शशांक on 24 October, 2017 - 06:36

असेच मी कधी तरी....

ऊंच ऊंच खोल खोल किती किती झुलायचे
कधी तरी क्षणात स्वस्थ होऊनी रहायचे

असेच मी कधी तरी मला कळून घ्यायचे
शरीरबंधनातूनी क्षणात मुक्त व्हायचे

कोण मी, कशास मी, कशास ते जगायचे
निरखिल्यावरी जरा प्रश्नही उरायचे ?

क्षणात हे क्षणात ते काय काय पाह्यचे
पाहणार कोण हा उमजूनिया घ्यायचे

भासमात्र सागरात किती बुडून जायचे
जागृतीत येऊनी श्वास एक घ्यायचे

क्षुद्र हीन दीन मी सदा कदा कुढायचे ?
मीच ब्रह्म गर्वगीत मनोमनी जपायचे

विराम लेखणीस हा हवाच की कधी तरी
शून्यमात्र होऊनी अशब्दतेत न्हायचे.....

Subscribe to RSS - शून्यमात्र