फक्त धूर

फक्त धूर

Submitted by शिवाजी उमाजी on 27 September, 2017 - 02:36

फक्त धूर

सुटलाय वारा हा गार आता
गडगडाटच होतो फार आता

बरसले काल ते भरून होते
रित्या आला कसा जोर आता

सांगावे का कुणी या ढगांना
रानात नाचतोय मोर आता

लावा झाडे नी जिरवा पाणी
येतोय नदिला या पूर आता

शाकारा कुंपणे ती आपली
करती घुसखोरी ढोरं आता

जाळ संपला नी सरपण ओले
चुलीत निघतो फक्त धूर आता

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29566/new/#new

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फक्त धूर