जिवंत

१२.१२.१२

Submitted by इब्लिस on 11 December, 2012 - 14:26

लोकहो,
१२.१२.१२ सुरू झाले.
जगबुडी अजून तरी आलेली नाही.
२१ ला उत्तरायण सुरू होते. तेव्हा येईल म्हणे Wink सो येत्या ९ दिवसांसाठी तुम्हाला शुभेच्छा.

या सगळ्या १२ मधे मधलाच २० का इसरताट कुनास ठाऊक

विषय: 
शब्दखुणा: 

माफ़ करा

Submitted by चाऊ on 13 August, 2010 - 10:43

माफ़ करा, मी जिवंत आहे
इतरांसारखे, स्वता:च्याच स्वार्थाचे
एकच लक्ष, मत्स्यनेत्राचे,
अनभिज्ञ इतर परीणामांबद्दल, किंवा,
बेसावध भक्षावर झडप घालणार्‍या,
पाण्याखालील वाळुत स्तब्धपणे
दबून बसलेल्या, विंचूमाशासारखा,
फुंकुन चिलीम लाचार मतलबाची
गपगार पडून, कर्तव्य विसरुन
सभोवतालकडे दुर्लक्ष करत
बधीर जगणे,... जगणे?
मृतवत, मला जमत नाही,
माफ करा, मी अजुनही जिवंत आहे

साळींदरासारख्या, उपद्रवमुल्यांच्या काटेरी
उर्मट, मुजोर स्पर्शाने अजुन
मला होतात वेदना, उमटतो उच्च स्वर
माफ करा

सत्तेच्या सिंहासनावर असला जरी दगड
झुकवुन मान, करावा कुर्निसात,
फिरवले घरावरुन नांगर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जिवंत