पैलतीर
Submitted by र।हुल on 25 August, 2017 - 08:08
पैलतीर
जिवनाच्या पैलतीरी मी आज
एकटाच ऊभा आहे ॥धृ॥
घडल्या घटनांकडे मी आता
तटस्थ पाहतो आहे ॥१॥
काळजीचा भार का अजूनी
खोलवर वाहतो आहे ?
भोगिली सगळी माया तरी
मोहात अजूनही आहे ? ॥२॥
निसटलेले धागे मी आज
का जुळवतो आहे ?
नसूनही हातांत काही का
मनांत जोडतो आहे ? ॥३॥
अंधूक क्षितिजा पल्याड काही
शाश्वत दिसते आहे
शोध घेण्यास गुढ अज्ञेयाचा
अंतरी आसुसलो आहे ॥४॥
जिवनाखेरी मी प्रांजळ काही
कबुली देतो आहे
शेवटल्या श्वासाला अस्फुट हसू
समाधान मागतो आहे ॥५॥
―₹!हुल / २५.८.१७
शब्दखुणा: