आर्जव

फुलरानी

Submitted by राज चव्हाण on 11 July, 2017 - 09:49

खुप मोह मला तुझ्या सहवासातील त्या क्षणांचा
श्वासात नेहमी दरवळतो गंध तुझ्या सर्वांगाचा..
स्वप्नात असतो गुंफुन बोटं नी हात हाती धरुन
स्पर्शातुन कळतं माझ प्रेम तुला काहीच न बोलुन...

स्वप्न नेहमी पाहतो सखे तुला खेटून बसायचे
तुझ्या मधुर श्वासतच मज श्वासांच्या मिलनाचे..
इतकी तु असावीस जवळ कि हृदय एक व्हावे
हृदयाचे ऐकत स्पंदन मी तुझ्यात समरुप व्हावे...

अनुभवतो मोरपंखी स्पर्श तुझ्या रेशमी केसांचा
केसातुनच मग शोध घेतो तुझ्या सुंदर मुखाचा..
केसाआड लपलेला तो गोड चेहरा मी चाचपताना
बिलगतेस हळुच मला अंगी रोमांच ते भिनताना...

Subscribe to RSS - आर्जव