चोरीला शिक्षा

चोरीला शिक्षा

Submitted by शिवाजी उमाजी on 9 July, 2017 - 22:42

चोरीला शिक्षा

एके दिवशी, झाले काय?
उंदराने ओढले, मांजरीचे पाय

मांजरी म्हणे, हे रे काय?
उंदिर सांगतो, गम्मत हाय

आपण दोघ, दुकानात जावु
आपल्या साठी, घ्यायला खाऊ

मांजरी म्हाणाली, चल तर निघु
नाही ना कुणी, दुकानात बघु

दोघं शिरले, दुकानाच्या आत
चाॅकलेटवर मारला, चांगला हात

दोघंही बसले, चाॅकलेट खात
ईतक्यात आला, मालक आत

ओरडून घेतली, हातात काठी
दोघही पळाले, दरवाज्या पाठी

घाबरून बसले, दोघं लपून
मालकाने घेतले, पोलिस बोलवून

पोलिसांनी त्यांना, नेलं पकडून
आणि ठेवलं, तुरूंगात डांबून

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - चोरीला शिक्षा