चोरीला शिक्षा

Submitted by शिवाजी उमाजी on 9 July, 2017 - 22:42

चोरीला शिक्षा

एके दिवशी, झाले काय?
उंदराने ओढले, मांजरीचे पाय

मांजरी म्हणे, हे रे काय?
उंदिर सांगतो, गम्मत हाय

आपण दोघ, दुकानात जावु
आपल्या साठी, घ्यायला खाऊ

मांजरी म्हाणाली, चल तर निघु
नाही ना कुणी, दुकानात बघु

दोघं शिरले, दुकानाच्या आत
चाॅकलेटवर मारला, चांगला हात

दोघंही बसले, चाॅकलेट खात
ईतक्यात आला, मालक आत

ओरडून घेतली, हातात काठी
दोघही पळाले, दरवाज्या पाठी

घाबरून बसले, दोघं लपून
मालकाने घेतले, पोलिस बोलवून

पोलिसांनी त्यांना, नेलं पकडून
आणि ठेवलं, तुरूंगात डांबून

चोरी करणं, केव्हाही वाईट
शिक्षा मिळते, मग जबरी टाईट
© शिवाजी सांगळे मो. +91 9545976589

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हे लिहायचे राहूनच गेले की
मालकाने काठी घेतली हातात पण कायदा हातात न घेता पोलिसाला बोलावले हे आवडले. Happy

छानच आहे. आवडली.

मालकाने काठी घेतली हातात पण कायदा हातात न घेता पोलिसाला बोलावले हे आवडले. Happy +१
Happy

हर्पैनजी, द स्मिताजी, निर्झराजी, राहुलजी व अभिनवजी आपणां सर्वांना मनस्वी धन्यवाद...

सुंदर !