होळी रे होळी पुरणाची पोळी...

होळीला शिव्या देण्यामागे काय शास्त्र आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2017 - 03:04

संतांची भूमी आहे महाराष्ट्र. तिथे एखादा सण असंस्कृत पद्धतीने साजरा केला जात असेल असे वाटत नाही. पण होळीला शिव्या देतात असे म्हणत सकाळपासून सर्व व्हॉटसपग्रूपवर नुसते शिव्यांची बरसात होताना दिसतेय. कुठे पारंपारीक शिव्या तर कुठे प्रतिभेला उधान आलेय. वर बुरा न मानो होली है आलंच.
मी नम्रपणे याला विरोध करताच तू सणांच्या दिवशी मांसाहार करतोस ते चालते असा आरसा दाखवण्यात आला. असो, तो मांसाहार वेगळा विषय झाला. पण एखादा सण शिव्या देत साजरा करणे ही खरेच प्रथा आहे की मूळ प्रथा वेगळी असून हे तिचे भ्रष्ट स्वरूप आहे. कृपया जाणकारांनी प्रकाश टाका.

धन्यवाद,
ऋन्मेष

Subscribe to RSS - होळी रे होळी पुरणाची  पोळी...