Good morning

माझा प्रवास - 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'सुप्रभात' पर्यंतचा.

Submitted by सचिन काळे on 22 December, 2016 - 23:21

Good morning म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा सकाळी भेटतात तेव्हा एकमेकांना नम्रपणे अभिवादन करताना बोलला जाणारा आंग्ल भाषेतील शब्द. एकमेकांशी बोलण्याकरीता काहीतरी विषय असावा म्हणून सकाळच्या उल्हासपूर्ण वातावरणाचा आपल्या अभिवादनात समावेश केला असावा. आपण जेव्हा कोणत्याही, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींना सामोरे जातो तेव्हा संभाषणाची सुरवात कुठून करावी हा प्रश्न पडतो. खरं तर दोघांनाही थोडेफार अवघडल्यासारखे होत असते. तेव्हा झालेली कोंडी फोडण्याकरिता एकमेकांना 'Good morning' अर्थात 'आजची सकाळ किती सुंदर आहे!!!' असं एकमेकांशी बोलून संभाषणाची सुरवात केली जाते.

Subscribe to RSS - Good morning