स्फुट ३६ - अखियोंके झरोकोंसे

स्फुट ३६ - अखियोंके झरोकोंसे

Submitted by बेफ़िकीर on 2 December, 2016 - 22:52

नुकताच ट्रक अंगावरून गेल्याने
आचके देणारं एक कुत्रं!

डावीकडे लांबवर उगवत असलेला एक गुलाबी गोळा!

उजवीकडून जीवघेण्या वेगाने जाणार्‍या
कर्कश्श्य हॉर्न वाजवणार्‍या
तावातावाने बघणार्‍या गाड्या!

टोलनाक्यावर असलेली रेटारेटी,
रांगेत घुसणारे असंस्कृत जीव,
काहीतरी दाखवून टोल चुकवू पाहणारे,
बॉबी, बिसलरी आणि काकड्या विकणारे,
भिकारी, हिजडे, हातातल्या तबकात देव घेऊन फिरणारे!

नद्या, पूल, कालवे, बोगदे, घाट!
चढ, उतार, वळणे, डायव्हर्जन्स!
ट्रॅफिक जॅम, एकाकी रस्ते
ढाबे, लॉजेस, बार,
पेट्रोल पंप, 'पंचर काढून मिळेल' वाले,
फाटे, वाड्या, वस्त्या
कुठेतरी उलटलेला ट्रक,

Subscribe to RSS - स्फुट ३६ - अखियोंके झरोकोंसे