नुकताच ट्रक अंगावरून गेल्याने
आचके देणारं एक कुत्रं!
डावीकडे लांबवर उगवत असलेला एक गुलाबी गोळा!
उजवीकडून जीवघेण्या वेगाने जाणार्या
कर्कश्श्य हॉर्न वाजवणार्या
तावातावाने बघणार्या गाड्या!
टोलनाक्यावर असलेली रेटारेटी,
रांगेत घुसणारे असंस्कृत जीव,
काहीतरी दाखवून टोल चुकवू पाहणारे,
बॉबी, बिसलरी आणि काकड्या विकणारे,
भिकारी, हिजडे, हातातल्या तबकात देव घेऊन फिरणारे!
नद्या, पूल, कालवे, बोगदे, घाट!
चढ, उतार, वळणे, डायव्हर्जन्स!
ट्रॅफिक जॅम, एकाकी रस्ते
ढाबे, लॉजेस, बार,
पेट्रोल पंप, 'पंचर काढून मिळेल' वाले,
फाटे, वाड्या, वस्त्या
कुठेतरी उलटलेला ट्रक,
अपोझिट साईडला घुसलेला ट्रेलर,
चुराडा झालेली कार,
कावळ्यांचे थवे व्यापतायत एखादा स्पॉट,
मेलेले जनावर चिवडायला!
आणि मधल्या लेनमधून
माझी एक संथ पांढरी कार!
'अखियोंके झरोकोंसे' ऐकत चाललेली,
गुडांग गरमच्या धुराने महकलेली
एकाकीपणाने बरबटलेली
जणू त्या वातावरणाचा भागच नाही ती!
सारे आयुष्य असेच,
हायवेवर,
मधल्या लेनमधून,
एकाकीपणे,
असंबद्धपणे,
जात राहणारे!
==============
-'बेफिकीर'!
सर तुम्हाला आपल्या ट्राफिक
सर तुम्हाला आपल्या ट्राफिक नियमांसंबंधी बोलायचंय का??????
प्रवास.... छान
प्रवास.... छान
आवडलं.
आवडलं.
छान लिहिलय. आपण सर्व नोटिस
छान लिहिलय.
आपण सर्व नोटिस करतो आणि तरीही किती निराळे राहतो, रस्त्यावरच कशाला? बस, ट्रेन, रस्ता, बिल्डिन्ग, पार्क, ऑफिस सगळीकडेच.
हम्म्म्म. असो.
अतिशय आवडलं स्फुट. अवती भवती
अतिशय आवडलं स्फुट.
अवती भवती अनेक गोष्टी घडत असूनही आपण आपलं एक संथ आयुश्य जगतच असतो.
रंगात रंगुनी सार्या रंग माझा वेगळा..
एकाकीपणाने बरबटलेली कार -
एकाकीपणाने बरबटलेली कार - प्रत्येकाच्या मनातल्या एकाकीपणाचे प्रतिनिधित्व करते.
बेफ़िकीरजी खूप छान स्फुट,
छान आहे!! आयुष्य असेच असते.
छान आहे!! आयुष्य असेच असते. सगळ्या कोलाहलात असूनसुद्धा एकाकी!!
एकाकीपणाने बरबटलेली >>> बरबटलेली हा शब्द मला थोडा विचित्र वाटला. आधीच्या दोन वाक्यांवरून वाटते की तुम्ही एकाकीपणाचा आनंद घेत आहात. पण बरबटलेली शब्दामुळे वाटते की ते एकाकीपण तुम्हाला नकोसे आहे. असाच परिणाम तुम्हाला अपेक्षित आहे का??? माझ्या interpretation मध्ये चूक झाली असल्यास क्षमस्व.
एकाकीपणा कधीही बरबटलेलाच
एकाकीपणा कधीही बरबटलेलाच असतो. हेमावैम