तळघराचे प्रवेश्द्वार उघडायला त्याचा हस्तस्पर्श पुरेसा होता...................

श्री संतराम (भाग ८ वा )

Submitted by मिरिंडा on 17 November, 2016 - 06:09

तळघराचे प्रवेशद्वार उघडायला त्याचा हस्तस्पर्श पुरेसा होता. त्याची रचनाच अशी केली होती की पंडीताखेरीज कुणाचाही कोणताही स्पर्श ते द्वार स्वीकारीत नसे. उघडलेल्या प्रवेशद्वारातील पायऱ्यां वरून पंडित जवळ जवळ तरंगतच गर्भगृहात शिरला. त्याला गर्भगृहाबाहेरील, त्याने वश केलेल्या अमानवी जीवांची पर्वा नव्हती. आतल्या खडकातल्या भिंतीत वेगवेगळ्या पिंजरेवजा कोठड्या होत्या त्यात बळी देण्यासाठी लागणारे प्राणी, माणसे, स्त्रीया आणि बालकेही होती. पण त्यांना योग्य तो आहार देऊन त्यांचे शरीर टिकवून ठेवले होते. ते वेगवेगळया वशीकरण मंत्रांनी भारलेले असल्याने पंडिताचे गुलाम म्हणून ते वावरत होते.

Subscribe to RSS - तळघराचे प्रवेश्द्वार उघडायला त्याचा हस्तस्पर्श पुरेसा होता...................