स्वप्नातलं भविष्य (भाग २ रा )
Submitted by मिरिंडा on 6 October, 2016 - 01:00
आपल्याला मामांनी पकडल्यासारखे तिला वाटू लागले. मग त्यांच्या तोंडून शब्द आले , " रेखा , अगं वेळ जात नाही म्हणून घराची झडती घ्यायला निघालीस की काय ? " तिला तो आवाज खोलीच्या ऐवजी गुहेच्या तोंडाक्डून आल्या सारखा वाटला. मामा आत आले, आणि खोलीचा दुसरा दरवाजा बंद करून त्यांनी तिचा हात घट्ट धरून तिला खोली बाहेर आणले. मग ते थोड्या जरवेनं म्हणाले, " जा, तोंड धुऊन घे आणि चहा टाक. " तिने हात सोडवून घेत त्यांच्या चेहऱ्या कडे पाहिले. त्यांचे डोळे कसल्यातरी विक्षिप्त लालसेने लकाकल्यासारखे दिसले. ती धावतच विहिरीवर तोंड धुवायला गेली. तिला अगदी चोरट्यासारके झाले. ती रात्र मामाही काही बोलले नाही आणी तीही.