काका गेल्यावर .....

कामथे काका (भाग १४ वा)

Submitted by मिरिंडा on 19 September, 2016 - 05:31

काका गेल्यावर साधनाला काही वेळ असाच घालवावा लागला. आतून सोना येऊन म्हणाली, "झालं तुझं समाधान? गेले ना काका शेवटी? चांगले बाहेर गेलो असतो. किती दिवसांनी ते आले होते. काय हे मम्मी, शी". मग तिला जवळ घेऊन साधना म्हणाली, " बाळ तुला अजून फारसं कळत नाही. बाहेरच जायचंय ना? आपण जाऊ की. " तिच्यापासून बाजूला होत सोना म्हणाली, " छट, सगळी मजा गेली. बाकीच्या मैत्रिणींचे बाबा कसे , कुठे ना कुठे तरी त्यांना घेऊन जातात .आपण फक्त घरीच बसतो. " ......... थोडा वेळ जाऊन देऊन साधना म्हणाली, " काय गं इतके दिवस कधी तुला बाबांची आठवण झाली नाही, काका गेल्यापासूनच व्हायला लागली का ?

Subscribe to RSS - काका गेल्यावर .....