जेमतेम बारा बाय दहाची ....................

कामथे काका (भाग २ रा )

Submitted by मिरिंडा on 2 September, 2016 - 01:53

जेमतेम बारा बाय दहाची रूम होती. आत एक जुनं लोखंडी कपाट एका भिंतीला उभं होतं. ते अर्थातच काकांचं होतं. त्याच्या आरशात काकांना आपलं प्रतिबिंब दिसलं. केवढा फरक पडला चेहऱ्यात त्यांच्या मनात आलं. तुरुंगात असताना, आरसा हा प्रकार कधी सापडला नाही. केव्हातरी एकदा दिसला तो भेटीच्या रूममध्ये, त्यात नक्की कुठल्या काळातलं प्रतिबिंब दिसायचं हे समजत नसे. फार वेळ त्यांनी त्यात घालवला नाही. बाजूला दुसरं एक लाकडी कपाट होतं. त्यालाही आरसा होता. पण काकांनी त्यात पाह्यलं नाही. बाजूच्या भिंतीला एक खिडकी होती. त्यातून पूर्वी त्यांच्या चाळी समोर असलेली दुसरी चाळ होती.

Subscribe to RSS - जेमतेम बारा बाय दहाची ....................