आल्या आल्या वाघमारे म्हणाले.............

प्रतिभा (अंतिम भाग)

Submitted by मिरिंडा on 29 August, 2016 - 08:28

आल्या आल्या वाघमारे म्हणाले, " थॅक्स मि. उत्तम. एवढं धाडस सहसा कोणी दाखवीत नाही. " त्यांच्या बरोबर असलेल्या लेडी कॉन्स्टेबलना त्यांनी प्रतिभाला ताव्यात घेण्यास सांगितले. त्याबरोबर नारायण भडकून म्हणाला, " लेकीन हमने किया क्या है ?" त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी सगळ्यांनाच ताव्यात घेण्यास सांगितले. प्रकाश अजूनही तळमळत होता. त्याला पाहून वाघमारे म्हणाले, " तुला आधीच पोलिस रेकॉर्ड आहे. चल ऊठ तू तर हवाच होतास. अमली पदार्थांचा पुरवठा करतोस आणि सभ्य माणसा सारखा फिरतोस काय ? " त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. त्याने एक हात गालावर ठेवला होता. त्याचा जबडा चांगलाच सुजला होता.

Subscribe to RSS - आल्या आल्या वाघमारे म्हणाले.............