वजन कमी करणे

मला समजलेलं इंटरमिटन्ट फास्टींग

Submitted by नलिनी on 28 March, 2017 - 06:48

मी माझ्या डाएटचा एक भाग म्हणून इंटरमिटन्ट फास्टींग करायला सुरवात केली. सुरवात करताना त्यावर जमेल तसं वाचन, इतरांचे अनुभव ऐकणे, वाचणे हे सुरू केले.

डाएटचा कोणताही प्रभाव न पडू देता मला समजले तसे आणि शक्य तेवढ्या सोप्या भाषेत मी ह्याबद्दल लिहीणार आहे.

इंटरमिटन्ट फास्टींग म्हणजे नक्की काय?
हे एक फॅड आहे का?
हे कोणी करावे? फक्त वजन कमी करण्यासाठीच करावे का?
मला डायबेटीस बरा करायला जमेल का? बरा नाहीच झाला तर कमीत कमी औषधांपासून माझी सुटका होईल का?
मला सकाळी उठल्यावर काहीतरी खायला लागतेच लागते, तर मी हे कसे करावे, मला जमेल का?

विषय: 

LCHF डाएट आणि मधुमेहासाठी माझा अनुभव - भाग ३

Submitted by नलिनी on 25 August, 2016 - 08:48

हे डाएट तीन भागात केले जाते असे म्हणता येईल.

डाएटच्या पहिल्या भागात पूर्वी सांगितलेल्या आहारातून कर्बोदके कमी करून स्निग्ध पदार्थ वाढवायचे आहेत; पण ते चवदार लागते म्हणून दिवसभराच्या एकूण कॅलरीजचे भान ठेवायचे. सुरुवातीच्या काळात भूक लागली की हाताशी सुकामेवा ठेवायचा. सुरुवातीच्या काळात प्रमाणात पाणी पिण्यावर लक्ष द्यायचे. प्रमाणात अशासाठी की अगदी मिनिटा मिनिटाला, तहान लागलेली नसताना दिवसाचे टार्गेट पूर्ण करायचे म्हणून, गरज नसताना ४-५ लिटर पाणी पिणे योग्य नाही.

विषय: 

LCHF डाएट आणि मधुमेहासाठी माझा अनुभव - भाग २

Submitted by नलिनी on 25 August, 2016 - 08:36

मला भात बंद करणे सहज जमले, परंतु चपाती एक तरी खायला हवी असे वाटायचे. पहिला दिवस एका चपातीवर निभावला. करून करायचे तर व्यवस्थितच करायला हवे (करून करायचे तर कच्चे का? अन माळ्यावर बसून अडचण क?) म्हणून मग चपाती ऐवजी भाकरी खावी असे ठरवले. एका जेवणात अर्धी ते पाऊण भाकरी.
गव्हातले आणि ज्वारी, बाजरीतले कर्बोदकांचे प्रमाण पाहिल्यास जवळपास ते सारखेच आहे हे तपासल्यावर चौथ्या दिवसापासून मी भाकरीपण पूर्णपणे बंद केली.

सुरुवातीचे तीन महिने पूर्णपणे वर्ज्य केलेल्या गोष्टी :
चपाती
भात
मैदा
गोड पदार्थ (कोशिंबीरसुद्धा
बिन साखरेची)
भाकरी
कडधान्ये
डाळी
बीन्स
मटार
मका (दाणे, पीठ)

विषय: 

LCHF डाएट आणि मधुमेहासाठी माझा अनुभव - भाग १

Submitted by नलिनी on 23 August, 2016 - 09:20

ऑगस्ट २०१५ च्या एका दुपारी जरा एका ऑफीसमध्ये काम होते म्हणून जेवण उरकून लेकाला घरीच ठेवून सायकलने निघाले होते. वाटेवर एका झाडाच्या ४-५ चेरी तोंडात टाकून जरा पुढे गेले आणि काही कळायच्या आतच चक्कर येऊन पडले. नशिबाने सायकल रस्त्याच्या कडेला गवतावर घेतली होती. विजेच्या पोलाच्या एक फूट पुढे जाऊन आणि मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वीच पडले होते.

सर्वात आधी एका गोष्टीचे बरे वाटले की, पिल्लू माझ्या सायकलवर मागे नव्हता. पण दुसरी काळजी अशी वाटली की, मला काही झालं असतं तर? नवरा भारतात गेलेला आणि लेकरू घरी एकटंच.

विषय: 

स्पॉट रीडक्शन

Submitted by माधुरी८५ on 21 August, 2016 - 23:26

लोकहो जरा सिरीयसली मदत ह्वी आहे. इंटरनेट वर शोधले पण सोल्युशन सापडले नाही. शरीरावरच्या एका ठराविक एरीयातले वजन आपण कमी करु शकतो का? माझ्या लोअर बॉडीवर खूप सारे फॅट जमा झाले आहे. अन डीलीवरी नंतर तर जास्त. सर्व टेस्ट करुन झाल्या म्हण्जे थायरॉएड वगैरे पण नॉर्मल आहेत तर ते कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारचे डायेट किंवा व्यायाम जास्त उपयोगी आहेत ? अस सोपं नाही स्पॉट रीडक्शन पण काहीतरी फरक पडेलच ना. सध्या वॉक कर्तेय १ तास दररोज. पण फरक नाही काही. बसुन काम आहे .

विषय: 
Subscribe to RSS - वजन कमी करणे