प्रकाश कोण हे शोधणं मला कठीणच होतं.

प्रतिभा (भाग १० वा)

Submitted by मिरिंडा on 19 August, 2016 - 06:58

प्रकाश कोण हे शोधणं माझ्यासाठी कठीणच होतं. माझ्या दृष्टीने जे काही झालं होतं, त्यात फक्त प्रतिभा, तिची मुलगी आणि नारायण एवढ्याच व्यक्ती समाविष्ट होत्या. पण माझी एक थिअरी होती. आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी आपण फक्त योग्य माणसाची निवड करावी आणि वाट बघावी. ती व्यक्ती स्वतः च अशी वागते किंवा बोलते की आपल्याला हवी माहिती आपोआप मिळते. पण ही थिअरी नेहमीच उपयोगी पडते असे नाही. काही वेळेला या थिअरीचा परिणाम दिसायला वेळ फार लागतो. नाहीतर मी पाठलाग केलाच नसता. ...माझ्या मनात नारायणचा प्रतिभाच्या नवऱ्याच्या प्रेतयात्रेला जाण्याचा काय संबंध आहे असेच होते. पण समोर काही वेगळेच घडायचे असावे.

Subscribe to RSS - प्रकाश  कोण हे  शोधणं मला   कठीणच होतं.