विश्वास
Submitted by मिरिंडा on 30 June, 2016 - 02:52
एका गावात पाऊस पडेना. सगळे गावकरी चिंतीत झाले. पाणी टंचाईने कावले. उन्हाळ्याने भाजले. बिच्चारे काकुळतीला येऊन देवाचा धावा करू लागले. पण काहीही होईना. रोज सकाळी उठून कपाळावर हात ठेवून आकाशाकडे आशेने पाहून कंटाळले. पण वरुण राजाला त्यांची दया येईना. ते आशेने गावातल्या चर्चमध्ये जमले. चर्चचे मुख्य उपदेशक त्यांना म्हणाले, " हीच प्रभूची इच्छा असावी. आपण प्रभूच्या इच्छेचा मान राखला पाहिजे. " पण त्याने गावकऱ्यांचे समाधान होईना. शेवटी उपदेशक म्हणाले, " आपण फादर पॅट्रिकना साकडे घालू या. आपल्यापैकी ज्येष्ठ गावकरी आणि मी असे मिळून त्यांच्याकडे जाऊ या. ते नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतील.
शब्दखुणा: