रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म

चॉकलेट

Submitted by जव्हेरगंज on 14 June, 2016 - 12:29

पक्याला वाईट सवय. स्टेशनवर घेऊन जायचा मला. आगगाड्यांचा खडबडाट नुसता. गर्दी म्हणजे नुसती चेंगराचेंगरी. थांबलेल्या मालगाड्या बघण्यात काय हशील? स्लीपर कोचात जावून झोपणं, असले उद्योग त्याचे. एकदा एसी डब्यातून हाकललं आम्हाला, साल्या झाडूवाल्यानं, छ्या.

चकमक चकमक रात्र होती.
अशीच खडबडत एक रेल्वे आली. थांबली. आणि निघून गेली.
जगाचं ओझं पाठीवर वाहीलेला माणूस दिसला. अगदीच थकलेला. माझ्या शेजारी येऊन बसला. म्हणजे बाकड्यावर.
मी सिगारेट काढली. अन उगाचच्या उगाच त्याला माचीस मागितलं. हे पक्याचे आवडते उद्योग. पण आज तो कुठे उलथलाय?

विषय: 
Subscribe to RSS - रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म